Breaking News

खामगाव साखरवाडीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Four members of the same family tragically died due to electric shock in Khamgaon Sakharwadi

    फलटण फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ९ : फलटण तालुक्यातील खामगाव साखरवाडी येथे पहाटे झालेल्या भीषण दुर्घटनेत विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ८) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास खामगाव साखरवाडी येथील पत्र्याच्या शेडच्या घराशेजारी ही घटना घडली. घरावरून जाणाऱ्या केबल वायरला आधार देण्यासाठी बांधलेली बाइंडिंग वायर एमएसईबीच्या अंडरकोटिंग वीजवाहिनीला घासल्याने वायरला कट पडला. त्यामुळे लोखंडी ताणलेल्या तारेला विद्युत प्रवाह आला आणि त्याच्या संपर्कात आल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.

    या दुर्घटनेत सतीश उर्फ पिसुरडया किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०), सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि आरती सतीश शिंदे (वय २४), सर्व रा. खामगाव साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांचा मृत्यू झाला.

    याप्रकरणी शितल सचिन शिंदे (वय २२, रा. खामगाव साखरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ७५/२०२६ बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

    या घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments