फलटण तालुक्यात ५१ गावांमध्ये पाणीटंचाई घोषित; ५ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० जून २०२६ : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने फलटण तालुक्यातील ५१ गावांमध्ये अधिकृतपणे पाणीटंचाई घोषित करण्यात आली असून स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून पाच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी विविध पर्यायी उपाययोजनाही राबविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
सध्या दुधेबावी व ११ वाड्या-वस्त्या, वाघोशी, सासवड व ५ वाड्या-वस्त्या, मानेवाडी व ४ वाड्या-वस्त्या तसेच मिरढे व ७ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यात पाणीटंचाई घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बु., सोनगाव, माळेवाडी, शिंदेमाळ, आंदरूड, नांदल, ढवळेवाडी, आसू, टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, दऱ्याचीवाडी, मिर्याचीवाडी, दालवडी, कोळाळे, कापडगाव, पवारवाडी, ताथवडा, चौधरवाडी, फरांदवाडी, बिबी, वाघोशी, पिराचीवाडी, जिंती, आळजापूर, आदर्की बु., मलवडी, ठाकूरकी, हणमंतवाडी, मठाचीवाडी, होळ, खामगाव, ढवळ, झडकबाईचीवाडी, जावली, कापशी, टाकुबाईचीवाडी, मिरढे, सरडे, आदर्की खु., हिंगणगाव, गोळेगाव पु., जाधवनगर, तांबवे, वडगाव, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, वडले आणि दुधेबावी या गावांचा समावेश आहे.
प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याची स्थिती सातत्याने आढावा घेतला जात असून, आवश्यकतेनुसार आणखी टँकर सुरू करण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

No comments