श्रीराम बझारमध्ये भव्य गहू महोत्सव योजना ; २१ भाग्यवान विजेत्या ग्राहकांस बक्षिसे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ जून २०२६ - श्रीराम बझार मुख्य कार्यालयासह १२ शाखांच्या माध्यमातून गेली ३८ वर्ष अखंडपणे ग्राहकांची विनम्रपणे सेवा करत ग्राहकांना उच्च व चांगल्या प्रतीचा माल सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाचा, हंगामातील अनेक प्रकारचा, नवीन व्हरायटीजचा गहू उपलब्ध करून देणेसाठी दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या मुख्य कार्यालयासह ११ शाखांमध्ये दि.०१ मार्च २०२६ ते ३१ मे २०२६ अखेर भव्य गहू महोत्सवाचे आयोजन करणेत आले होते.
गहू महोत्सवामध्ये नामांकित कंपनीचे गहू वाजवी दरामध्ये विक्रीस उपलब्ध करणेत आले होते. या महोत्सवामधून ३० किलो व त्या पटीत गहू खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी २१ भाग्यवान विजेत्या ग्राहकांस कुपनवर एकूण २१ गालीचे बक्षिस (२१ बक्षिसे विभागून) जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणेत आली होती.
गहू महोत्सव योजनेची सोडत रविवार दि. १४/०६/२०२६ साय. ५.०० वा. श्रीराम बझार, मुख्य कार्यालय, फलटण तसेच संस्थेच्या सबंधित शाखांवर ग्राहकांना वाटप झालेल्या कुपनच्या प्रमाणात येथे आयोजित करणेत आली होती. याप्रसंगी बझारचे जनरल मॅनेजर श्री. अनंत पाटील यांनी उपस्थित ग्राहकांना गहू महोत्सव योजनेची माहिती सांगून महोत्सवामध्ये वाटप झालेली कुपन्स तसेच गहू विक्रीची माहिती सांगितली. गहू महोत्सव योजनेमधून एकूण १११६ कुपन्स वाटप झाले असून यावर्षी मुख्य कार्यालय व सर्व शाखा मिळून एकूण ७४३ क्विन्टल गहू विक्री झाली आहे.
गहू महोत्सवामधून वाटप झालेली कुपन्स एकत्रित करून लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढणेत आली. विजेत्यांची नावे व तपशील पुढीलप्रमाणे- १ राजेश पटेल,फलटण, २ प्रदीप तुकाराम मोरे, स्वामी विवेकानंदनगर, फलटण, ३ हणुमंत जयसिंग वर्पे सांगवी ता. फलटण, ४ अरविंद बापू पिसे, म्हसवड ता. माण, ५ चंद्रसेन नरहर कुमठेकर गोळीबार मैदान, फलटण ६ विराज वसंत निकाळजे विडणी ता. फलटण ७ अशोक लक्ष्मण बोडके साखरवाडी ता. फलटण ८ अमरजित अशोक गायकवाड ठाकुरकी ता. फलटण ९ दिनेश दिलीप घोरपडे जाधववाडी, बिरदेवनगर, फलटण १० गायत्री चव्हाण साखरवाडी ता. फलटण ११ अमोल शंकरराव पवार कोळकी ता. फलटण १२ गणपत सोपानराव सस्ते निरगुडी ता. फलटण १३ महेश प्रकाश कोंडेकर नक्षत्र सिटी, शिरवळ ता. खंडाळा १४ तुषार विठ्ठलराव बोबडे शिरवळ ता. खंडाळा १५ हिरालाल कासबाराम प्रजापती शिरवळ ता. खंडाळाब १६ अंकुश निवृत्ती वीर सांगवी, शिरवळ ता. खंडाळा १७ आयुष धर्मेंद्र रणवरे महतपुरा पेठ, मलठण १८ जयकृष्ण चंद्रशेखर महाजन दहिवडी ता. माण १९ महादेव दादासाहेब शिंगाडे दहिवडी ता. माण २० आनंदराव महादेव केंडे कोरेगाव जि. सातारा २१ महेश रघुनाथ भागडे कोरेगाव जि.सातारा. विजेत्या ग्राहकांनी आपली बक्षीसे सबंधित शाखेतून लवकरात लवकर घेवून जाणेचे आवाहन श्रीराम बझारचे वतीने करणेत आले आहे.

No comments