श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्या सासकल येथे दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ मे २०२६ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी मौजे सासकल ता फलटण, जि सातारा येथे दाखल झाल्या असून,सासकल ग्रामपंचायत उपसरपंच, सौ. सोनाली मदने, ग्रामविकास अधिकारी अशोक सापते, ग्राममहसुल अधिकारी अंजली धर्माधिकारी सहाय्यक कृषि अधिकारी श्री सचीन जाधव, पोलिसपाटील श्री दत्तात्रय सोनवलकर ग्रामपंचायत सदस्य श्री. मनोहर मुळीक, श्री हणमंत मुळीक, श्री मोहन मुळीक, सौ लता मुळीक, सौ लक्ष्मी आडके या ग्रामस्थांनी या उद्यानकन्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले.
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या या विद्यार्थिनी, शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन, गावामध्ये शेती विषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारे वापर शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे था उद्यान कन्यांनी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविद्या कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत. रिया गोदारा, प्रेरणा कदम, शरयु कोकरे, ऐश्वर्या मेटकरी, रक्षिता होर्ती, दिशा सोनवणे, भाग्यश्री कांबळे. या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, सहाय्यक कृषि अधिकारी ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण, कार्यक्रम. अधीकारी ए.डी. पाटील, प्रा. डॉ. जे. व्ही.लेंभे, प्रा. डॉ. ए. आर. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

No comments