Breaking News

फलटण प्रशासनात नेत्यांना प्राधान्य, अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक ; पालखी नियोजन बैठकीतील आसनव्यवस्थेवरून सोशल मीडियात चर्चा

Phaltan administration gives priority to leaders, treats officials as secondary; Discussion on social media over seating arrangement at palanquin planning meeting

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा)  दि.२९ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतील आसनव्यवस्थेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

    सदर बैठकीत माजी खासदार, नगराध्यक्ष, आमदार, प्रांत अधिकारी तसेच एका पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष हे पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या तहसीलदारांच्या दालनात ही बैठक पार पडली, ते तहसीलदार दुसऱ्या रांगेत कोपऱ्यात बसलेले असल्याचे त्या व्हायरल फोटोमध्ये दिसून येत आहे.

    या फोटोच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी प्रोटोकॉल आणि शासकीय कार्यक्रमातील आसनव्यवस्थेच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी याला सामान्य बाब मानत अनावश्यक वाद निर्माण करू नये, असे मत व्यक्त केले आहे.

    दरम्यान, या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी पालखी सोहळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीतून असा फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

फलटण प्रशासनात नेत्यांना प्राधान्य, अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक” अशा आशयाच्या टिपण्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नागरिकांनी शेअर केल्या. विशेषतः “माननीय तहसीलदार यांनाच बॅकबेंचर करण्यात आले” अशी टीका उद्योजक संग्राम अहिवळे यांनी केली आहे.

No comments