Breaking News

दारू न दिल्याने हॉटेल मालकास लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण

Hotel owner beaten with iron rod and stick for not serving alcohol

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - पावरवाडी ता. फलटण येथे हॉटेल उघडून दारू न दिल्याने हॉटेल मालकास पाच जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण केल्या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दिंनाक 05/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास मौजे पवारवाडी ता. फलटण गावचे हद्दीत आमित गार्डन व परमीटरुम बिअरबार नावचे हॉटेलच्या पाठीमागे गुरांच्या गोठ्या शेजारी असलेल्या रुमसमोर 1) आकाश विष्णु शिंदे 2) आमन विष्णु शिंदे 3) विशाल दिनकर ननवरे सर्व रा. हणमंतवाडी ता. फलटण यांनी, सुमित शिरीष पवार यास, तु आम्हाला हॉटेल उघडुन दारु दे असे म्हणुन सुमित पवार यास आकाश विष्णु शिंदे, विशाल दिनकर ननवरे यांनी हाताने माराहण करून शिवीगाळ, दमदाटी करत तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने  सुमित याच्या पाठीत मारले व आमन विष्णु शिंदे याने लोखंडी रॉड डोक्यात मारून सुमितला जखमी केले असल्याची फिर्याद सुमित शिरीष पवार वय 30 वर्षे व्यवसाय- हॉटेल रा. पवारवाडी ता. फलटण यांनी दिली आहे.

No comments