आ. सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर - जयकुमार शिंदे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - कोळकी जिल्हा परिषद गटात वाड्यावस्ती वर लाईट ची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार सचिन पाटील, मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सौर दिवे मंजूर करणयात आले आहेत. यामुळे लोकाची सोय होणार आहे. तसेच डोंगरी विकास योजनेतुन दालवडी या ठिकाणी बंदिस्त गटर योजनेतून ५ लाख रुपये मंजुर तसेच भाडळी खु येथे बंदिस्त गटर योजनेतून २.५० लाख मंजूर करण्यात आले आहेत. आमदार फंडातून गोळेगाव ठाकुरकी ,झिरपवाडी येथे रस्त्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजुर करण्यात आले तसेच गिरवी जाधववाडा येथे ७ लाखांचा सभामंडप मंजुर करण्यात आले असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
कोळकी २ नग, गिरवी ३ , धुमाळवाडी २, बोडकेवाडी२, भाडळी खुर्द २, भाडळी बु, २, सोनवडीबु, २कुरवली २ , जाधववाडी २, झिरपवाडी , २,ठाकुरकी२, चावडी २, दालवडी, २, निरगुडी, २, मांडवखडक २, विचुरणी २, सासकल २ असे एकुण ३५ सौर दिवे मंजुर करण्यात आले आहेत.

No comments