जिल्हा परिषदेच्या निवडीमध्ये लोकशाहीचा गळा घोटून भाजपाने सत्ता मिळवली - सह्याद्री कदम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ -सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीकडे बहुमत असताना भाजप कडून लोकशाहीचा गळा घोटून ठोकशाहीने आपले अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आणले.असा घणाघात शिवसेना पक्षप्रतोद तथा युवानेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी या प्रक्रियेत दांडगावा केला या घटनेची सखोल चौकशी करून या दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची फेरनिवड करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी फलटण येथील विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे इतर सदस्य गिरीश बनकर,श्रीमती रुपाली लक्ष्मण सरगर,वैशाली ताई कांबळे,ज्योतीताई मोरे,हे उपस्थित होते. दरम्यान या निवडीमध्ये जिल्हाधिकारी यांनी घटनेची पायमल्ली केली असून ते बोलत असताना त्यांनी प्रोटोकॉल ची माहिती सर्वांना दिली मात्र निवड प्रक्रिया सुरू झालेल्या वेळेपासून त्यांनी सर्वच प्रक्रिया हातात घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा कोणताही विचार न करता दांडगाईने प्रक्रियेत आमच्या सदस्यांनी कुठ बसायचं काय करायचे हे ठरवत होते कामेश कांबळे आमच्या बाजूला बसत होते मात्र त्यांना भाजपाने आपल्या गोटात घेत त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत तसेच चिमटे कढीत त्यांच्यावर बळजबरी केली जात असल्याचे समोर निदर्शनास आणून दिले मात्र तरीही आमचे ऐकून घेतले गेले नाही उलट आमच्या सदस्यांनाच दम भरीत तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाही असे ऐकवत होते त्याचबरोबर आमच्या शिंदे यांचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार नोंदवली त्या साठी आमचे दोन सदस्य अनिल भाऊ देसाई व संदीप मांडवे यांना मतदानासाठी अगदी काही पावले राहिली असताना अक्षरशः बळजबरीने उचलून नेले,घटनेने सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिला आहे, जेल मधून तुम्ही निवडणूक लढवू शकता,मतदानाला येऊ शकता अशी तरतूद असताना आमच्या दोन सदस्यांनी अपहरण केले अशी तक्रार नोंदवली होती ते स्वतः निवडणूक प्रक्रिये वेळी आमच्या समोर व सोबत होते त्यांनी तसे पोलिस अधीक्षक यांना सांगितले की माझे कोणीही अपहरण केले नाही मग या दोघांना फरफटत पोलिसांनी नेले हे लोकशाहीला शोभणारे न्हवते असे सह्याद्री कदम यांनी सांगितले.
दरम्यान या निवडीमध्ये पूर्णतः जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा पोलिस प्रमुख असतील हे भाजपाचे असल्यासारखे वागले असून ही निवड रद्द करण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना पोलिसांनी ज्या प्रकारे वागणूक दिली त्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवला असून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार असून पुढील न्यायालयीन लढा उभारला जाणार असल्याची माहिती इतर सर्व सदस्यांनी बोलून दाखवली त्याचा बरोबर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आमच्या सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले होते मात्र भाजपाच्या लोकांकडे मोबाईल फोन होते ते सतत कामेश कांबळे यांच्या कानाला फोन लावून धमक्या देत होते या सर्व गोष्टींचे सीसी टीव्ही फुटेज तपासून या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली पाहिजे असे गिरीश बनकर यांनी स्पष्ट केले.

No comments