Breaking News

कोकरेवाडी, विडणी येथे रानगव्याचा हल्ला; एक जण गंभीर जखमी

Wild boar attack in Kokarewadi, Vidni; One person seriously injured

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - कोकरेवाडी, विडणी परिसरात रानगव्याचा अचानक हल्ला झाल्याची घटना घडली असून या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    परिसरात रानगवा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत विडणीचे सरपंच सागर अभंग यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वनविभागाने तात्काळ हस्तक्षेप करून रानगव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. रानगव्यामुळे निर्माण झालेली भीती दूर करून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No comments