विज्ञानाचा आधार घेऊन युवकांनी संशोधनाकडे वळावे - डॉ. पुनीत घरत
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण, मराठी विज्ञान परिषद, मुंबई व मराठी विज्ञान परिषद, फलटण आयोजित व्याख्यानामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधन करताना विज्ञानाचा आधार घेऊन युवकांनी संशोधनाकडे वळावे, विज्ञानाद्वारे अधिकतम तंत्रज्ञान विकसित होत आहे, विज्ञान हा संशोधनाचा मूलभूत आधार आहे, विज्ञानाद्वारे मानवाने सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यावर भर देण्यात आला आहे, शेतीचा विचार करता विज्ञान हे शेतकऱ्यांच्या उच्चतम प्रगतीसाठी विज्ञानाचा आधार घेऊन कृषी विद्यापीठांनी संशोधनामध्ये उच्चतम प्रगती केली आहे असे प्रतिपादन मराठी विज्ञान परिषद, मुंबईचे डॉ. पुनीत घरत यांनी केले. व्याख्यानाचे प्रास्ताविक मराठी विज्ञान परिषद, फलटणचे श्री. शामराव आटपाडकर यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत व सन्मान दोन्ही महाविद्यालयातर्फे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी केले. सदरील व्याख्यानासाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकोतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर व आभार प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी व्यक्त केले.

No comments