शिवानी पुंजा यांची कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरपदी निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - कोळकी ता. फलटण येथील शिवानी रविंद्र पुंजा यांची कॅनरा बँकेमध्ये परिविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी ऑफिसर) म्हणून निवड झाली आहे. बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या आयबीपीएसपीओ या परीक्षेत त्यांनी यश मिळविल्याने त्यांची सदर नियुक्ती झाली आहे.
शिवानी पुंजा या कोळकी ता. फलटण येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण बारामती येथे, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कृषि महाविद्यालय, फलटण येथे झाले आहे. यापूर्वी शिवानी हिने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लार्क ची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले होते, ती बँकेच्या पंढरपूर शाखेत नियुक्त होती. त्यानंतर तिने जिद्दीने पुढीलप्रमाणे परीक्षा देणे सुरु ठेवल्याने तीला सदर यश प्राप्त झाले आहे. शिवानी हिचे वडील रविंद्र पुंजा हे हॉटेल व्यावसायिक आहेत तर आई सुनीता या गृहिणी आहेत. तीच्या या यशाबद्दल तीचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व कोळकी ग्रामस्थांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

No comments