लाडक्या बहिणींना आवाहन : १७वा–१८वा हप्ता न मिळालेल्यांनी संपर्क साधावा - नगरसेविका सिद्धाली शहा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - लाडकी बहिण योजनेअंतर्गत डिसेंबर व जानेवारी महिन्याचा १७ वा व १८ वा हप्ता अद्याप न मिळालेल्या महिलांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका सिद्धाली शहा यांनी केले आहे. संबंधित महिलांचा हप्ता नेमका का थांबला आहे, याची खात्री करून तो पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक अर्ज भरून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी चुकून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थींना मिळालेला नाही. अशा महिलांची झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यांचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे किंवा अद्याप जमा झालेला नाही, त्यांनी कोणतीही चिंता न करता संपर्क साधावा, असेही नगरसेविका सिद्धाली शहा यांनी स्पष्ट केले आहे. संपर्क क्रमांक : ९६८९९४१००८

No comments