Breaking News

6 महिन्यात फलटण खड्डेमुक्त ; शब्दाला बांधील - रणजीतसिंह यांची ग्वाही

Phaltan will be pothole-free in 6 months; Will keep his word - Ranjit Singh assures

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेल्या उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करतानाच, निवडणूक काळात सहा महिन्यात फलटण खड्डे मुक्त करणार या शब्दाला आपण बांधील असून, आजपासून सहा महिन्यात फलटणला खड्डे मुक्त करणार असल्याची ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    फलटण नगरपालिकेचे निवडणुकीत आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवला व भाजपा राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी केले आणि फलटण तालुक्यात परिवर्तन घडवले, त्याबद्दल फलटणच्या तमाम नागरिकांचे मी आभार मानतो, लोकांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे, त्या जबाबदारीतून कधीही मुक्त न होता, जे निवडणूक काळात आम्ही शब्द दिले होते, त्या शब्दाला बांधील राहून, फलटणचा चेहरा मोहरा बदलून टाकू, तसेच नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर समशेरदादांनी जो फलटणच्या जनतेला शब्द दिला होता की, फलटण खड्डे मुक्त करणार त्याप्रमाणे, सहा महिन्यात फलटणला खड्डे मुक्त करण्याचा संकल्प करून, येणाऱ्या 6 महिन्यात  आपण फलटणमध्ये परिवर्तन करू असा शब्द  माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.

    फलटण पालिकेत सत्ता काबीज करीत, भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आली होती, त्या अनुषंगाने आज उपनगराध्यक्ष पदी सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक सुदामआप्पा मांढरे यांची तसेच माजी गटनेते अशोकराव जाधव तसेच शिवसेनकडून ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत उपनगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडी करण्यात आल्या. गेली तीस वर्षे हुन अधिक काळ एकहाती सत्ता असलेल्या राजेगटाकडून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस ने सत्ता खेचून आणत थेट नगराध्यक्ष पदी समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासाह तब्बल अठरा नगरसेवक निवडून आणत फलटण नगरपालिकेवर भाजपा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता.

    नूतन उपनगराध्यक्ष पदी सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक तथा जेष्ठ नेते बाळासाहेब भोसले यांनी केला. यावेळी उपनगरध्यक्ष अन स्वीकृत नगरसेवक पदी निवड होताच गुलाल अन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी शेकडो समर्थकांनी नूतन निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.यावेळी सर्व नगरसेवक तसेच अधिकारी उपस्थित होते.

No comments