Breaking News

जीएसटी व टॅक्स कन्सल्टन्सी चे कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार - श्रीमंत संजीवराजे

Self-employment for students with GST and tax consultancy skills - Shrimant Sanjeevraje

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - वाणिज्य विद्याशाखा मुधोजी महाविद्यालय फलटण व चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे यांनी असे प्रतिपादन केले की कॉमर्सच्या पदवी बरोबरच विद्यार्थ्यांना  जीएसटी व करविषयक व्यवहारांचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे की ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार प्राप्त होऊ शकेल. आज प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना उद्योजकांना कंपन्यांना टॅक्स सल्लागारांची आवश्यकता असून त्यासाठी विद्यार्थ्यांना असे शॉर्ट टर्म कोर्सेस देऊन कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी शिकवलेल्या मूलभूत संकल्पनांबरोबरच त्यांचा प्रत्यक्षातील वापर कसा करावा यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित करून जर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले तर अशा प्रकारचे कौशल्य मिळू शकते व अशा प्रकारच्या कौशल्ययुक्त विद्यार्थ्यांची आज व्यवसायामध्ये गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक श्री मेहुल मेहता चार्टर्ड अकाउंटंट सातारा यांनी कॉमर्स विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या कडे मूलभूत संकल्पनांचे ज्ञान आहेच त्याला जर अशा प्रकारच्या व्यावसायिक ज्ञानाची जोड दिली तर आमच्या व्यवसायाची गरज पूर्ण होईल त्यासाठी अशा प्रकारच्या  प्रशिक्षणाची गरज असून आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही  महाविद्यालयात असे प्रशिक्षण वर्ग घेणार असून सातारा जिल्ह्यातील मुधोजी महाविद्यालय हे असे पहिले महाविद्यालय आहे की ज्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना कार्पोरेट अकाउंटिंग, पार्टनरशिप अकाउंटिंग बरोबरच एका चांगल्या अकाउंटंट ची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना जीएसटीचे व अन्य विविध करांची आकारणी व त्याच्यातील क्लिष्टता कमी करण्यासाठी विविध करविषयक बदलांचा अभ्यास करणे गरजेचे असते असे सांगताना त्यांनी राजेशाही काळातील दिवाणजी पासून आजचा अत्याधुनिक लेखापाल हा अर्थव्यवस्थेमध्ये एक विकासातील सहयोगी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला युवक हा भारताच्या विकासात तेव्हाच सहभागी होईल जेव्हा तो प्रशिक्षित होईल. बदलत्या कर विषयक कायद्यांची माहिती घेऊन प्रॅक्टिस करणे गरजेचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी टॅली, जीएसटी, इन्कम टॅक्स, एक्सेल इत्यादी बाबतचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले. तर चैतन्य सडेकर जीएसटी प्रॅक्टिशनर सातारा यांनी मार्गदर्शन करताना आम्हाला अशा प्रकारच्या कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांची गरज असून महाविद्यालयांनी अशा प्रकारचे कोर्सेस चे आयोजन करावे त्याला आमचे लोक तज्ञ म्हणून उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

    या कार्यशाळेचा लाभ बीकॉम व बीबीए च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या आरंभी प्रा. लक्ष्मीकांत बेळेकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तदनंतर मान्यवरांचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी पी शिंदे, वाणिज्य विद्या शाखा इन्चार्ज ज्योत्स्ना बोराटे मॅडम, अर्थशास्त्र विभाग प्रमुख अशोक जाधव, वरिष्ठ लेखापाल श्री कुंमरे, तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. ललित वेळेकर तर आभार प्रदर्शन डॉ. सागर निकम यांनी केले.

No comments