बिबी गावचे उद्योजक दत्तात्रय खाशाबा उर्फ डी. के.बोबडे यांच्या एकसष्टी निमित्ताने जाहीर सत्कार व जाहीर मेळावा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - बिबी गावचे उद्योजक दत्तात्रय खाशाबा उर्फ डी. के.बोबडे यांच्या एकसष्टी निमित्ताने रविवार दि.18 जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक बिबी येथे जाहीर सत्कार समारंभ तसेच भाजपा व मित्र पक्षांचा जाहीर मेळावा आयोजित केला असून बिबी व पंचक्रोशीतील सर्व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित केला असून, या वेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,युवानेते अमरसिंह उर्फ अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बिबी ग्रामस्थानी केले आहे.

No comments