वाठार निं.येथे मंगळवार 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बिजोत्सव, व पालखी सोहळा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - धर्मनाथ बीज उत्सव आणि पालखी सोहळा मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी ओम् चैतन्य सद्गुरू श्री कानिफनाथ महाराज मठी वाठार निंबाळकर येथे आयोजित केला असून या सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती सद्गुरु श्री शिवेंद्रनाथ महाराज यांनी केले आहे.
वाठार निंबाळकर ता. फलटण येथे वर्ष सहावे हा धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या उत्साहात तसेच हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात येतो यावेळी हा उत्सव मंगळवार दि. 20 जानेवारी रोजी होत असून सकाळी 7 ते 7.30 मठातील देवतांची नित्य पूजा 7.30 ते 8.30 सद्गुरु पाद्यपूजा अनअभिषेक 8.30 ते 9 भाविक भक्तांसाठी चहा व नाश्ता,9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नाथपंथीय होम हवन दुपारी 12 ते 12:30 नवनाथ महाराजांची महा आरती 12.30 ते दुपारी 1 नाथपंथी अनुग्रह दुपारी बारा तीस ते तीन उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी एक ते तीन नातपंथीय शाहिरी कार्यक्रम सायंकाळी 4 ते रात्री 7.30 सद्गुरु पालखी सोहळा व गावातून मिरवणूक प्रदक्षणा रात्री 7.30 ते रात्री 8 वाजता महाआरती यानंतर रात्री 8 ते 10 ओम चैतन्य कानिफनाथ महाराज भजन कार्यक्रम अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून या बीजोत्सव सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मठाधिपती ओम चैतन्य सद्गुरू श्री शिवेंद्रनाथ महाराज यांनी केले आहे.

No comments