निष्ठावंत शिवसैनीकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीला उमेदवारीच नाही ; शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार?
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - अगदीच शेवटच्या टप्प्यात निवडणूकीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांचा काटा काढल्याची चर्चा फलटण तालुक्यात सुरु असून, आत्तापर्यंत गट जिवंत ठेवाण्याचे काम फलटण तालुक्यातील त्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी केले, मात्र खुद्द पालकांमंत्री असो किंवा वरिष्ठ नेते यांनी, त्या जुन्या शिवसैनिकांचा राजकीय बळी दिल्याने, कट्टर शिवसैनिक नक्कीच शिवसेनेला "राम राम "करण्याच्या तयारीत असून जुने शिवसैनिक पालकमंत्री यांच्यावर नाराज आहेत.
नुकतेच पलीका निवडणुकीत राजेगटाने शिवसेनेत प्रवेश करीत पालिका निवडणुक लढवली, यावेळी निष्ठावंत शिवसैनिकाला एकही जागा दिली नाही, तरीही राग मनात न ठेवता, त्या शिवासैनिकांनी प्रचाराची मोठी खिंड लढवली, वेळप्रसंगी भाजपावर अक्षरशः तुटून पडले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाला तसेच भाजपाला सळो की पळो केले, जुने नवे लोकांना बरोबर घेत चांगली लढत दिली, तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीला ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिकाला नव्या गटाने अजिबात विश्वासात घेतले नाही, त्यामुळे पालकमंत्री तसेच जिल्हा समर्क प्रमुख किंवा जिलाध्यक्ष यांनी दूरक्ष केल्याने त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा फलटण येथे सुरु आहे.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा सुरु आहे.

No comments