विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून युवा नेते तथा दानशूर व्यक्तिमत्व पैलवान विष्णू पंत लोखंडे यांनी शेकडो समर्थकांसह आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांचे कडे दाखल केला.
वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व विष्णू लोखंडे यांनी आज बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करीत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ढवळगाव चे सरपंच म्हणून कार्यरत असताना, त्याचबरोबर दुष्काळ पडल्यामुळे आपल्या गावासह आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी पैलवान विष्णुपंत लोखंडे यांनी हजारो शेतकऱ्यांना मदत केली होती. त्याचबरोबर कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या ढवळ गावातील किंवा आसपासच्या तरुण मुलांना कुस्तीसाठी आखाडा तयार करून देणे, त्याचबरोबर त्यांना कुस्ती बाबत आवड निर्माण होण्यासाठी नेहमी तत्परता दाखवत, आपल्या भागातील तरुणांसाठी खूप मोठे कार्य केले होते. त्याचबरोबर पंचायत समितीला निवडणुकीत निसटता पराभवाचं शल्य मनात न ठेवता पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसह सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जात, नेहमी सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असलेल्या आपला माणूस अशी ओळख असलेल्या युवा नेतृत्वाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भाजपा सह मित्र पक्षांचे पदाधिकारी तसेच वाठार निंबाळकर गटातील शेकडो लोक उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
No comments