Breaking News

कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, फलटणच्या दिवेश मोहिते याची पश्चिम भारत आंतर विद्यापीठ हॉकी क्रीडा स्पर्धा 2026 साठी निवड !

Divesh Mohite of College of Pharmacy and Research Centre, Phaltan selected for the West India Inter-University Hockey Games 2026!

    फलटण - नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय, पेठ नाका ,कोल्हापूर या ठिकाणी दि.18 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड अंतर्गत आंतर विभागीय हॉकी निवड चाचणी स्पर्धा यशस्वी संपन्न झाल्या. सदर निवड चाचणी साठी महाराष्ट्रातील एकूण 23 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. सदर निवड चाचणी मधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर फलटणच्या कु. दिवेश रविंद्र मोहिते याची भोपाळ मध्य प्रदेश येथे दि .12 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या पश्चिम भारत अंतर विद्यापीठ हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूस महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक श्री. श्रीकांत कवितके यांनी मार्गदर्शन केले .या यशस्वी खेळाडूचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रिडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. टी. देशमुख आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील रस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments