मौजे नांदल येथील ५ युवकांची इंडियन आर्मीमध्ये निवड ; अमित रणवरेंनी केले अभिनंदन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 14 : मौजे नांदल, ता. फलटण येथील पाच युवकांची इंडियन आर्मीमध्ये नुकतीच निवड झाली असून या यशामुळे नांदल गावासह फलटण तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. देशसेवेची संधी मिळालेल्या या युवकांचे फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री. अमित रणवरे यांनी निवड झालेल्या युवकांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील देशसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री. रणवरे म्हणाले की, “देशासाठी सेवा करण्याची संधी मिळणे हे गौरवास्पद आहे. नांदल गावातील युवकांनी इंडियन आर्मीमध्ये निवड होऊन संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.”
इंडियन आर्मीमध्ये निवड झालेले युवक प्रतिक कारंडे, सुदीप सरक, इरफान पठाण, प्रेम कोळेकर व शुभम कोळेकर आहेत.

No comments