पांडुरंग अहिवळे यांच्या पाठिंबामुळे प्रभाग 2 मध्ये विजय निश्चित- श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - रोजी प्रभाग क्र. 2 मधील इच्छुक व प्रबळ दावेदार पांडुरंग समुद्रालाल अहिवळे व त्यांच्या कन्या कु.ऋतिका पांडुरंग अहिवळे यांच्याशी श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पांडुरंग अहिवळे यांच्या निवासस्थानी चर्चा केली व आपला प्रभाग क्र. 2 मध्ये फलटण नगरपरिषद शिवसेना धनुष्यबाणाला जाहीर पाठिंबा असल्याचे पांडुरंग अहिवळे यांनी जाहीर केले.
फलटण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 2 मधील पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी राजे गटाला ताकद देण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत बंडाळी माजू नये, विरोधकांना आयते कोलीत मिळेल व शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे मताधिक्य घटेल याची जाणीव ठेवून शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे उमेदवार अनिकेत राहुल अहिवळे व सौ.आरती जय रणदिवे (काकडे ) हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून यावेत म्हणून स्वतःची व आपल्या मुलीची उमेदवारी अर्ज माघारी घेतला व राजे गटाला तथापी शिवसेना धनुष्यबाणाला जाहीर पाठिंबा देऊन, राजे गटाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना धनुष्यबाणाचा विजय निश्चित असल्याचे श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

No comments