फलटण नगरपालिका रणसंग्राम : अंतिम उमेदवार यादी - कोण उमेदवार? कोणाच्या विरोधात?
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.२२ - फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होत असून या लढतीकडे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे दोन व नगरसेवक पदाचे 25 अर्ज मागे घेतले असून, बहुतांश प्रभागात दुरंगी व तिरंगी लढत होत आहेत.
प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये लक्ष्मी प्रमोद आवळे, अपूर्वा प्रथमेश चव्हाण,अस्मिता भीमराव लोंढे, नर्मदा किसन पवार यांच्यात तर प्रभाग 1 ब मध्ये सुमन रमेश पवार, सोमाशेठ गंगाराम जाधव, देविदास किसन पवार यांच्यात लढत होईल.
प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये मीना जीवन काकडे, आरती जयकुमार रणदिवे, सोनाली संग्राम अहिवळे यांच्यात तर प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये सुपर्णा सनी अहिवळे, अनिकेत राहुल अहिवळे, कुणाल किशोर काकडे यांच्यात लढत होईल.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये सचिन रमेश अहिवळे, सिद्धार्थ दत्ता अहिवळे, पूनम सुनील भोसले, आशय हनुमंत अहिवळे, सुनील जनार्दन निकुडे यांच्यात तर प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये सुलक्षणा जितेंद्र सरगर, सुषमा हेमंत ननावरे यांच्यात लढत होईल.
प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये रूपाली सुरज जाधव, हेमलता चंद्रकांत नाईक यांच्यात तर प्रभाग 4 ब मध्ये राहुल जगन्नाथ निंबाळकर व अझरुद्दीन ताजुद्दीन शेख यांच्यात लढत होईल.
प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये कांचन दत्तराज व्हटकर, योगेश्वरी मंगेश खंदारे, सुरेखा श्रीकांत व्हटकर यांच्यात तर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये रोहित राजेंद्र नागटिळे, विजय हरिभाऊ लोंढे, शुभांगी मुकुंद गायकवाड यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये किरण देवदास राऊत, दीपक अशोक कुंभार यांच्यात तर प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर व अमिता सदाशिव जगदाळे यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये स्वाती राजेंद्र भोसले, श्रीदेवी गणेश करणे, लता विलास तावरे यांच्यात तर प्रभाग 7 ब मध्ये अशोक जयवंत जाधव, पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 8 अ मध्ये फिरोज शहानवाज आतार , विशाल उदय तेली यांच्यात तर प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये शितल धनंजय निंबाळकर , सिद्धाली अनुप शहा, सुवर्णा अमरसिंह खानविलकर यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 9 मध्ये रजिया महबूब मेटकरी, कविता श्रीराम मदने, मंगल अतुल मोहोळकर यांच्यात तर प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये सचिन चंद्रकांत गानबोटे, अमोल प्रकाश भोईटे, सुरज हिंदुराव कदम, पंकज चंद्रकांत पवार यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये रेहाना बशीर मोमीन ,जयश्री रणजित भुजबळ, श्वेता किशोर तारळकर यांच्यात तर प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये अमित अशोक भोईटे, गणेश सूर्यकांत शिरतोडे, मोनिका महादेव गायकवाड यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 11 मध्ये संदीप दौलतराव चोरमले, कृष्णाथ मल्हारी चोरमले, अमीर गनिम शेख यांच्यात तर प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये प्रियंका युवराज निकम, प्रियदर्शनी रंजीतसिंह भोसले यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 12 मध्ये अरुण हरिभाऊ खरात , विकास वसंतराव काकडे, ओम प्रकाश पाटोळे यांच्यात तर प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये नताशा रोहन पवार, स्मिता संगम शहा, स्वाती हेमंत फुले यांच्यात लढत होईल
प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये मोहिनी मंगेश हेंद्रे, सानिया फिरोज बागवान, पाकीजा अमीर शेख यांच्यात तर प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये रूपाली अमोल सस्ते, निर्मला शशिकांत काकडे यांच्यात व प्रभाग 13 क मध्ये राहुल अशोक निंबाळकर, मनोज दत्तात्रय शेडगे व सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांच्यात लढत होईल.

No comments