शिवसेना व मित्र पक्षांचा पालिका निवडणूक प्रचार शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व कृष्णा-भिमा विकास आघाडी या मित्र पक्षांचा फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभउद्या रविवार दिनांक 23/11/2025 सकाळी ठीक 9:00 ते 12:00 वाजता श्रीराम मंदिर, फलटण होणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, कृष्णा भीमा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फलटण नगर परिषद निवडणूकितील नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अॅड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार यांचा प्रचार शुभारंभ व प्रचार सभा यावेळी होणार आहे.

No comments