Breaking News

शिवसेनेच्या दीपक शिंदे यांचा भाजपात प्रवेश

Shiv Sena's Deepak Shinde joins BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - संत बापुदास नगर फलटण येथील युवा नेतृत्व दीपक शिंदे यांचा शिवसेना शिंदे गटाला राम राम ठोकत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला. याप्रसंगी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर ,माजी नगरसेवक अशोकराव जाधव, तुकाराम शिंदे ,बापूराव शिंदे मान्यवर उपस्थित होते.

    आरती दीपक शिंदे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवाराना मताधिक्याने विजयी करणार असल्याचे मत यावेळी दिपक शिंदे यांनी व्यक्त केले.

No comments