पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेचे फलटण मध्ये उत्स्फूर्त स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सुमारे ५ हजार किलोमीटर लांब पल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचे रविवारी फलटण नगरीत आगमन झाले. सायकल वारीचे स्वागत व संत नामदेव जयंती निमित्त सवाद्य शोभा यात्राही उत्साही वातावरणात संपन्न झाली.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा रविवार दि. २ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ दरम्यान ३१ दिवसांची भव्य रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.
वारीचे हे चौथे वर्ष असून ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यातून प्रवास करणार आहे. या वारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. देशातील ही पहिली अध्यात्मिक सायकल वारी आहे.
पंढरपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकाऊन या भव्य सायकल वारीचा शुभारंभ करण्यात आल्या नंतर ही सायकल वारी फलटण येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी विसावली तत्पूर्वी फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे शिंपी समाज व राजकीय, सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी(बेडके),सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख,दशरथ फुले,ऍड ऋषीकेश काशीद,राजू देशमाने,नंदकुमार मोरे,पत्रकार बाळासाहेब ननवरे,किरण बोळे,युवराज पवार यांच्या सह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतेक्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून संत नामदेव महाराज जयंती निमित्त सवाद्य शोभा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आली. संत सावतामाळी महाराज येथे संत नामदेव व संत सावतामाळी अशी संतभेट करण्यात आली,राजुरी ता.फलटण येथे ही संत साधुबुवा यांची अभंगाच्या गजरात संतभेट करण्यात आली,काळज ता.फलटण येथे सरपंच संजय गाढवे व फलटण तालुका सायकल असोसिएशन च्या वतीने चहा व नास्था सोय करण्यात आली होती,फलटण येथे रात्रीचा निवास व भोजन व्यवस्था विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले तर शोभा यात्रेचे नियोजन शिंपी समाज बंधू भगिनी व फलटण येथील पंढरपूर ते घुमान सायकल वारी स्थानिक कमिटी ,फलटण ना.स.प.यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी शिंपी समाजातील जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे, नामदेव समजोन्नती परिषदेचे फलटण चे अध्यक्ष करण भांबुरे,महिला मंडळ अध्यक्ष सुलभाताई मोहोटकर,अविनाश कुमठेकर,महेश हेंद्रे, मोहन जामदार,विजय उंडाळे श्रीकांत मुळे ,सुनील पोरे,शेखर हेंद्रे,मृणाल पोरे,मंगेश पोरे,विजय कुमठेकर,राहुल जामदार,डॉ राजेंद्र हेंद्रे, बापू गाटे,दिगंबर कुमठेकर, दत्तात्रय पवार,रामचंद्र हेंद्रे, संतोष बाचल, संत नामदेव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ अंजली कुमठेकर,अश्विनी हेंद्रे, यांच्यासह विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) या जन्मभूमी ते तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या कर्मभूमी पर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती ,समता व बंधूता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती . महाराष्ट्र , मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश , दिल्ली , हरियाणा , पंजाब , राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करुन ही यात्रा शुक्रवारी महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासीक फलटण नगरीत दाखल झाली . नाईक निंबाळकरांच्या श्रीराम मंदिरात या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले व श्रीराम मंदिरात संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व आरती करण्यात आली . त्यानंतर श्रीराम मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य रथयात्रा काढण्यात आली . यामध्ये फलटण शहरातील शिंपी समाज बंधू भगनी सह वारकरी सहभागी झाले होते.
मिरवणुकीच्या मार्गावर शिंपी समाजातील सुवासिनींनी सडा, रांगोळी टाकून पंचारातीने ओवाळून स्वागत केले. श्री विठ्ठल मंदिरात पादुकांची पूजा व अभिषेक शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे नूतन अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी सपत्नीक केला . घुमाण यात्रेत सहभागी सायकल यात्रींचा व भजनी मंडळाचा शाल व श्रीफळ देवून महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

No comments