श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - आगामी फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, कोळकी (ता. फलटण) येथे संपन्न झाल्या.
या मुलाखती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सुकाणू समितीच्या निरीक्षणाखाली पार पडल्या.या वेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, प्रमोद निंबाळकर, मिलिंद नेवसे, आनंद भोसले, भरत ढेम्बरे, किशोर देशपांडे, जाधव वकील, बापू आहेरराव, जीवन केंजळे, दादासाहेब चोरमले, सौ. सुपर्णा अहिवळे, शैलेश रसाळ, फिरोज बागवान, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
दि. ६ व ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात केलेल्या कार्याचा आढावा तसेच आगामी विकास आराखडा समितीसमोर सादर केला. अनेक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी, अशी विनंतीही यावेळी केली.मुलाखतीनंतर प्रभागनिहाय उमेदवारीची निवड लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

No comments