Breaking News

फलटण प्रकरणाबाबत माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना पोलीस विभागामार्फत जारी

Guidelines for media regarding Phaltan case issued by Police Department

    फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.६ - सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. ३४५/२०२५भारतीय न्याय संहित्ता ६४ (२) इत्यादी प्रमाणे दि. २४/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

    सदर गुन्ह्यांमध्ये १) गोपाळ बाळासाहेच बदने, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे २) प्रशांत किसन बनकर वय २९ वर्ष रा. फलटण हे आरोपी असून यामध्ये मयत पिडीत महिला आहे.

    सदरचा गुन्हा हा अत्यंत संवदेनशिल आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यातील पिडीत व्यक्तीचे नाव पत्ता अथवा त्या व्यक्तीची ओळख उघड होईल अशा प्रकारची कोणत्याही माहितीचा समावेश आपल्या बातमीमध्ये किंवा महिती पत्रामध्ये असणार नाही याची दक्षता घ्यावी व संवेदनशीलता जपावी.

    तसेच सदर गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया सुरु असल्याने गुन्ह्याच्या तपासाच्या बाबत कोणताही विपर्यास निर्माण करणारी, तथ्यहिन माहिती बातमी प्रसारित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पिडीत व्यक्ती अथवा अन्य संबधीत कोणत्याही व्यक्तींचे चारित्र्यहनन करणारी किंवा चारित्र्याबद्दल संशय निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे ही आपली वैयक्तीक जबाबदारी असेल.

    महिलांवरील अत्याचारांच्या घटने बाबत दिली जाणारी सार्वजनिक बातमी / माहिती / दृश्ये हि कायद्याच्या मर्यादेत असणे बंधनकारक असून कायद्याचे कोणतेही उल्लंघन होवून प्रसारित झाल्यास आपण भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (IPC २२८ अ), भारतीय राज्य घटनेचे कलम २१ तसेच The Digital Personal Data Protection Act २०२३ मधील तरतुदीचे उल्लंघन होवून आपण गुन्हेगारी कृत्यास पात्र ठरतो याची जाणीव असावी, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कळविले आहे.

No comments