फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी एसआयटी तपास पथकामध्ये एकूण ८ अधिकाऱ्यांची नेमणूक
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.६ - येथील पिडीत महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी प्रमुख तथा समादेशक राज्य राखीव बल गट क्रं-१ च्या तथा सातारा जिल्हा तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेसह विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण,सोलापूर ग्रामीण येथील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. याबाबतचे आदेश समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान या विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, तपास अधिकारी तथा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पुणे ग्रामीण लोणावळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने तपासाला गती मिळणार आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी तसा आदेश काढला आहे.त्यामुळे या तपासाला वेग येणार आहे.

No comments