बांगलादेशीवासियांचे साताऱ्यात अवैध वास्तव्य ; कोंबिंग ऑपरेशन करण्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी
सातारा दिनांक 7 प्रतिनिधी सातारा शहरांमध्ये बांगलादेशांमधील नागरिकांचे अवैधरित्या वास्तव्य आहे त्यामुळे या नागरिकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येथे तातडीने शोध मोहीम राबवावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली .शुक्रवारी सोमय्या यांनी साताऱ्याला भेट दिली त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली या बैठकीदरम्यान त्यांनी ही मागणी केली .
सोमय्या यांच्या या मागणीमुळे साताऱ्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे .जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला .ते म्हणाले बेकायदेशीर बोगस जन्म दाखले मिळवून महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य आहे .सातारा जिल्ह्यात सुद्धा त्यांची वास्तव्य आहे अशा नागरिकांचा तातडीने शोध घेतलाच आणि अत्यंत गरजेचे आहे .याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे याबाबत तातडीने प्रशासनाने मोहीम राबवावी अशी मी मागणी त्यांना केली आहे असे ते म्हणाले .
अचानक साताऱ्याच्या दौऱ्यावर येण्यामागचे कारण सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले महाराष्ट्रातील बेकायदेशीर वास्तव्य करणारे नागरिक याबाबत माझा वर्षभर अभ्यास सुरू आहे येथील नागरिकांना बोगस जन्म दाखले आधार कार्ड ही उपलब्ध होत असतात यामागे मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे त्याचा तातडीने शोध घेतला आणि गरजेचे आहे .तसेच महाबळेश्वर येथील संवेदनशील वन क्षेत्रामध्ये नियमांचे उल्लंघन करून अनेक रिसॉर्ट आणि बंगले उभे राहिलेले आहेत याबाबतही मोठी कारवाई होणे गरजेचे आहे .याबाबत मी लवकरच तातडीने महाबळेश्वरला जाणारा असून येथील अवैध बंगल्यांचे तातडीने सर्वेक्षण करणार आहे याबाबतची उपलब्ध माहिती झाल्यानंतर मी स्वतंत्रपणे पुन्हा पत्रकारांशी बोलेल असे ते म्हणाले.

No comments