प्रभाग ८ मध्ये सौ.सुवर्णा खानविलकर यांचा होम-टू-होम प्रचार ; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८-ब मधून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर व विशाल तेली यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत होम-टू-होम प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सौ. खानविलकर या यापूर्वी नगरसेविका म्हणून काम पाहिल्याचा अनुभव त्यांना असून, आपल्या कार्यकाळात प्रभागात विविध विकासकामांची अंमलबजावणी केली आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी तत्परता दाखवणे, आणि सर्वसामान्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे ही त्यांची कार्यशैली असल्याने प्रभागात त्यांचा जनसंपर्क भक्कम आहे.
नागरिकांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग ८-ब मध्ये सौ. सुवर्णा खानविलकर यांचा प्रचार उत्साहात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments