प्रभाग ८ मध्ये सिद्धाली शहा यांचा प्रचार जोरात; सामाजिक कार्य आणि सरकारी योजनांतील सक्रिय योगदान ठरतंय आकर्षण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या प्रचाराची छाप अधिक गडद करण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबाच्या दशकांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा ठोस वारसा आणि स्वतः केलेली सामाजिक कामगिरी यावर त्यांनी मतदारांसमोर भक्कम भूमिका मांडली आहे.
केवळ वडील अनुप शहा यांच्या नावावर निवडणूक न लढवता, प्रत्येक सामाजिक उपक्रमात आपण सक्रिय सहभाग घेतल्याचे सिद्धाली शहा स्पष्टपणे सांगत आहेत. “नगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा आमच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून—अनुप शहा यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात मी सहभागी आहे. त्यामुळे मला आता सेवेची संधी द्या,” अशी आत्मीय विनंती त्या घराघरांतून करत आहेत.
सिद्धाली शहा यांचे ‘हाऊस टू हाऊस’ जनसंपर्क अभियान प्रभागात प्रभावी ठरत असून, त्यांनी मतदारांच्या समस्या ऐकून घेणे, उपायांची माहिती देणे आणि कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देणे सुरू ठेवले आहे. प्रभागातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांबाबतही त्या सविस्तर माहिती देत आहेत.
लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, मतदार नोंदणी अभियान, स्व-निधी योजना, ‘सूर्यघर योजना’, ‘बांधकाम कामगार योजना’, ‘घरकुल योजना’, ‘आयुष्यमान भारत योजना’ अशा अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांचा पाढा त्या मतदारांसमोर मांडत आहेत.
एकंदरीत, सामाजिक कार्याचा वारसा आणि सरकारी योजनांची माहिती या दोन स्तंभांवर सिद्धाली शहा यांनी आपला प्रचार मजबूत केला आहे. जनसंपर्कातला उत्साह, विकासाभिमुख भूमिका आणि कुटुंबाच्या कामातला त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे प्रभाग ८ मध्ये सिद्धाली शहा यांच्याविषयी सकारात्मक चर्चा वाढत आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील मतदार सिद्धाली शहा यांना किती मोठा कौल देतात, हे निकालात स्पष्ट होणार असले तरी, त्यांच्या प्रचाराचा वाढता वेग आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे.

No comments