Breaking News

फलटण येथे 7 डिसेंबरला हेरिटेज मॅरेथॉन स्पर्धा

Heritage Marathon competition on December 7th in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ -  फलटण हेरिटेज मॅरेथॉन 2025 चे आयोजन 7 डिसेंबर 2025 रोजी केली असल्याची माहिती डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली. यावेळी नानासाहेब काळूखे अनुजा त्रिकुटे डॉ. चंद्रशेखर जगदाळे प्रवीण शेठ घोरपडे उपस्थित होते.

    यावेळी माहिती देताना डॉ. रवींद्र बिचुकले यांनी सांगितले की फलटण हे ऐतिहासिक शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ त्याचबरोबर महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या फलटणमध्ये प्रभू श्रीराम मंदिर जबरेश्वर मंदिर संतोषगड,वारुगड अशी फलटण तालुक्यात ऐतिहासिक ठिकाणे असून या फलटण शहरामध्ये गेली दोन वर्ष झाले फलटण रनर्स फाउंडेशन आपल्या माध्यमातून वृक्षारोपण सायकली फिटनेस बाबतीत व्याख्यान व प्रबोधन करतात त्याचबरोबर रन फॉर नेचर पोलुशन कंट्रोल शारीरिक फिजिकल फिटनेस त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईचा जाणारा वेळ हा व्यायामाकडे वळावा यासाठी प्रबोधन करीत असतात त्याचबरोबर या फाउंडेशन मधील तब्बल 160 सदस्य असून यामध्ये 20 महिला सहभागी असतात त्यांच्या प्रत्येकाच्या वाढदिनी डोंगराळ भागात विविध देशी झाडांचे वृक्षारोपण केले जाते त्याचबरोबर त्याचे संगोपन ही केले जाते.

    फलटण शहरातील अनेक नामवंत डॉक्टर तसेच व्यापारी युवा वर्ग यांच्या माध्यमातून अनेक आयर्न मॅन फलटणमध्ये घडले असून त्यांच्या माध्यमातून फलटणकरांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले जाते त्याचबरोबर डायट प्लॅन देत आहाराबाबत व आहाराच्या वेळेबाबत मोलाचे असे मार्गदर्शन केले जाते अशी माहिती डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली.

    फलटण हेरिटेज मॅरेथॉन 2025 ची सात डिसेंबर 2025 रोजी सजाई गार्डन फलटण ते विंचूरणी अशी आयोजित केली असून यामध्ये पाच किलोमीटर फन रन वय वर्ष 12 वरील सर्वांसाठी तसेच दहा किलोमीटर व 21 किलोमीटर अशी आयोजित केली असून या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या फलटणची ओळख जगाच्या नकाशावरती जाण्यासाठी सर्वांनी आपली नाव नोंदणी 20 नोव्हेंबर पूर्वी करावी अशी विनंती फलटण रनर्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments