प्रभाग 12 मधून सौ. सुनंदा शहा यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - प्रभाग क्रमांक 12 मधून सौ. सुनंदा शहा यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सौ. शहा या सागर शहा यांच्या मातोश्री असून, याच प्रभागातील रहिवासी असल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. प्रभागात सागर शहा यांचा व्यापक जनसंपर्क असून, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यात ते सतत पुढाकार घेत असल्याने शहा कुटुंबाची सकारात्मक प्रतिमा अधिक दृढ झाली आहे.
दरम्यान, सागर शहा व शहा काकींनी आबासाहेब मंदिरात भेट देऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रभागात फिरून नागरिकांशी संवाद साधला. उमेदवारीबाबत प्रतिक्रिया विचारल्या असता, युवा वर्ग, महिला व ज्येष्ठांनी शहा काकींच्या उमेदवारीचे स्वागत केले. "असे सक्षम नेतृत्व असेल तर प्रभागाचा विकास अधिक वेगाने होईल," अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
"मूलभूत सुविधा असोत किंवा कोणतीही अडचण आली तर थेट संपर्क करा. आमचे घर सर्वसामान्यांसाठी सदैव खुले आहे," असे आश्वासन शहा काकींनी दिले. यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत जनतेमध्ये अधिक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

No comments