फरांदवाडी येथे ट्रान्सफॉर्मरमधील २५ हजारांचे कॉपर चोरीला
फलटण - मौजे फरांदवाडी तांबमाळ रस्त्यालगत असलेल्या रेल्वे डी.पी. इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची सुमारे ५० किलो वजनाची कॉपर वायर चोरून नेली. या प्रकारात ट्रान्सफॉर्मरमधील १०० लिटर ऑइल सांडल्याने अतिरिक्त नुकसानही झाले आहे.
हि घटना दि.२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी हणमंत भिसे (वय ४०, रा. कांबळेश्वर, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०३(२), ३२४(४)(५), तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ नुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हवा. बी. आर. साबळे यांच्याकडे असून पुढील तपास सुरू आहे.
No comments