अन्न व औषध प्रशासनाचा फलटण मधील व्यापाऱ्यांना नाहक त्रास - सुधाकर गानबोटे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ सप्टेंबर २०२५ - अन्न व औषध प्रशासनाचा प्रचंड त्रास फलटण शहर तसेच उपनगरे व ग्रामीण भागातील व्यापऱ्यांना होत असून, या जुलमी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोण लगाम लावेल का? असा संतप्त सवाल मिठाई संघटनेचे सदस्य सुधाकर गानबोटे यांनी केला आहे.
लोकांच्या आरोग्याची आम्हालाही काळजी आहे, शेवटी लोक आमच्याच फलटण शहरातील व आमच्या तालुक्यातील आहेत, त्यामध्ये आमचे कुटुंब, कुटुंबातील लोक सुद्धा अन आम्ही विक्रेतेही ती मिठाई किंवा अन्नपदार्थ खात असतो आम्ही मिठाई केंद्रे ही काय फक्त पैशे कमविण्यासाठी उभारली नाहीत आम्ही त्यातून पहिला परमार्थ अन नंतर स्वार्थ पाहतो उठसुठ तुमच्यासारखे कागदी घोडे नाचवीत एनकेन प्रकारे नाहक त्रास देत नाही हे पहिले समजून घ्या असे सुधाकर गानबोटे यांनी अधिकाऱ्यांना खडसून सांगितले यापुढे आम्हाला अधिकाऱ्यांनी नाहक त्रास दिल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारू असेही स्पष्ट करीत असलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध नोंदवला.
No comments