सातारा तालुक्यातून 142 गुन्हेगार हद्दपार
सातारा दिनांक ३ प्रतिनिधी - गणेश भक्तांचा प्रिय असणारा चैतन्य सोहळा अर्थात गणेशोत्सव हा उत्तरार्धाच्या टप्प्यात आहे तर मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा ईद-ए-मिलाद हा सण येत्या शुक्रवारी (दि ५ ) साजरा केला जाणार आहे .या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा तालुक्यातून सराईत 142 गुन्हेगार हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत . हे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत.
सातारा शहर व सातारा तालुका या दोन्ही पोलीस ठाण्याकडून सराईत गुन्हेगारांची यादी प्रतिबंधात्मक कारवायांच्या निमित्ताने मागवण्यात आली होती .27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या दरम्यान सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा होत आहे तब्बल साडेसात हजार गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली आहे तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलाद येत्या शुक्रवारी दिनांक पाच रोजी साजरा होत आहे या सणाच्या काळामध्ये अवैध व्यवसाय करणारे,तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असणारे गंभीर गुन्ह्याची नोंद असणारे अशा अट्टल सराईतांची यादी तयार करण्यात आली होती असे तब्बल 142 गुन्हेगार सातारा तालुक्यातून दिनांक 5 सप्टेंबर ते सात सप्टेंबर या दरम्यान हद्दपार करण्याचे निर्देशित आहे . सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेत वरील आदेश दिलेले आहेत.
सातारा शहरातील गुरुवार पेठ, शनिवार पेठ, शहर लगतचे कोडोली, सदर बाजार , खेड, प्रतापसिहनगर, केसरकर पेठ, कोयना सोसायटी सदर बाजार, बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसर , चंदन नगर, कोडोली,मल्हार पेठ, सातारा आंबेडकर सोसायटी सातारा रविवार पेठ, जगतापवाडी शाहूनगर, प्रतापसिंह नगर,मल्हार पेठ,क्षेत्र माहुली, महागाव, इंदिरानगर झोपडपट्टी विलासपूर, धनगरवाडी , कोडोली, मातंग वस्ती धनगरवाडी, मल्हारपेठ,केसरकर पेठ, गोडोली, तसेच लक्ष्मी टेकडी ,दत्तनगर रविवार पेठ,शहराच्या तसेच सातारा तालुक्याच्या वेगवेगळ्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे .सातारा शहर व तालुका पोलिसांनी पेट्रोलिंग करणाऱ्या बीट मार्शल तसेच बीट अंमलदारांना संबंधित गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांना हद्दपार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
No comments