ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ सप्टेंबर २०२५ - ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उभयतांच्या नागरी सत्काराचे आयोजन बुधवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय फलटण येथील समारंभाद्वारे करण्यात आले आहे. या महत्वपूर्ण समारंभास फलटण शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, आपणही आपल्या सहकाऱ्यांसमवेत या समारंभास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या समारंभाचे अध्यक्ष असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर स्वागताध्यक्ष आहेत. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आणि युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते या उभयतांचा यथोचित नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी आ. सचिन पाटील, माजी आमदार दिपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, फलटण नगर परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, दै. ऐक्य साताराचे संपादक शैलेंद्र पळणीटकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन विश्वासराव निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिपक मेहता, शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष नानासाहेब उर्फ पिंटू इवरे, आर.पी.आय. जिल्हा सचिव विजय येवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार आणि समितीचे सचिव सुभाषराव भांबुरे हे निमंत्रक आहेत.
या समारंभातच सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याशी संबंधितांना या समारंभास आवर्जून निमंत्रित करण्यात आले आहे. आपणही गेल्या ५० वर्षात अरविंद मेहता यांच्याशी संबंधित आहात, संपर्कात आहात त्यासाठी आपणास समक्ष निमंत्रण देणे आवश्यक आहे, तथापि वेळेअभावी ते शक्य होईल असे वाटत नाही, तरी आपण हेच निमंत्रण समजून या समारंभास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन नागरी सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सत्कार समारंभास येताना कृपया, हार गुच्छ भेटवस्तू वगैरे काहीही आणू नये. आपली उपस्थिती हाच अरविंद मेहता व सौ. इंदूमती मेहता यांचा सन्मान असल्याने आपली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नमूद करीत, सत्कार समारंभा नंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा आपण अवश्य आस्वाद घ्यावा असे आवाहन सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments