फलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना ; आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले स्पष्ट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ ऑगस्ट२०२५ -संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला या नाऱ्याला फलटण तालुक्यातील मराठा समाजाने उस्फुर्त असा प्रतिसाद देत आज 28 रोजी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी लढा उभारला होता, या लढ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी व न्याय हक्कासाठी 27 ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मार्गस्थ झाले. दिनांक 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणास बसणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी, मराठा क्रांती मोर्चा फलटण तसेच अखंड मराठा समाज आज गुरुवार दिनांक 28 रोजी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटणचे सर्व समन्वयक यांनी गेली आठ दिवस झाले, फलटण शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजामध्ये जनजागृती करून, आता कुठे जायचं...मुंबईला जायचं... हा नारा दिला होता, यामुळे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हजारो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयक यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा नारा दिला असून, तब्बल हजारो वाहने मुंबईकडे रवाना झाली असून, कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण मिळवायचे व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील मराठा समाज एकवटला असून हजारो युवक आज गुरुवार दि.२८ रोजी मार्गस्थ झाले.
No comments