बिएलओ व पर्यवेक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑगस्ट २०२५ - पंचायत समिती फलटण येथे दि.३१ जुलै रोजी बुथ लेव्हल अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास उपस्थितांची चांगली गर्दी लाभली होती.
प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून मुश्ताक महात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने विषय मांडला. हसतखेळत वातावरणात हे प्रशिक्षण पार पडल्याने उपस्थितांनी याचा भरपूर लाभ घेतला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार बागवान मॅडम, परिविक्षाधीन मुख्याधिकारी वाघमारे, उपमुख्याधिकारी तेजस पाटील, गायकवाड विजय व फड साहेब हे अधिकारी विशेष उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्रानंतर मुश्ताक महात यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
No comments