मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम व मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑगस्ट २०२५ - संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती मोर्चा,फलटण यांच्यावतीने ओंकार वृद्धाश्रम कुरवली तसेच मूकबधिर विद्यालय ठाकूरकी ता.फलटण या ठिकाणी फळांचे वाटप करण्यात आले.
मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज १ ऑगस्ट रोजी वाढदिवस मात्र स्व.संतोष देशमुख व स्व.महादेव मुंडे यांच्या मृत्यूमुळे मराठा समाज दुःखामध्ये असल्यामुळे माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही, असे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे या वर्षी वाढदिवस साजरा करण्यात आला नाही, मात्र गरीब गरजू लोकांना त्यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्यावतीने ओंकार वृद्धाश्रम कुरवली ता.फलटण या ठिकाणी भेट देऊन, तेथे असलेल्या वृद्धांचे दुःख जाणून घेण्यात आले, यातूनच समाजाचे विचित्र असे चित्र समोर आले. तसेच या वृद्धांच्या आशीर्वाद मनोजदादा जरांगे पाटील यांना मिळो त्यांना उदंड दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच मूकबधिर विद्यालय या ठिकाणी भेट देण्यात आली. तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून मूकबधिर विद्यार्थी तसेच संस्था यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.यापुढे मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्यावतीने ओंकार वृद्धाश्रम व मूकबधिर विद्यालय फलटण यांना पुढील काळात मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक उपस्थित होते.
No comments