Breaking News

फलटण तालुका सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले तर उपाध्यक्षपदी जयकुमार शिंदे

Dilip Singh Bhosale is the president of the Federation of Phaltan Taluka Cooperative Credit Societies and Jayakumar Shinde is the vice-president

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑगस्ट २०२५ -  ‘‘सहकारी पतसंस्थेपुढील सद्यस्थितीतील आव्हाने लक्षात घेऊन फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने सर्व पतसंस्था पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन करण्याची सुरुवात तत्परतेने केली जाईल’’, अशी ग्वाही श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी दिली.

    फलटण तालुका सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्यादित, फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ बैठकीत दिलीपसिंह भोसले यांची अध्यक्ष तर जयकुमार शिंदे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. संस्थेचे संचालक रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते यावेळी या उभयतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिलीपसिंह भोसले बोलत होते.

    ‘‘फलटण तालुक्यात सध्या 68 सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. त्यांचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापक यांची लवकरच बैठक घेऊन फेडरेशनच्या माध्यमातून या सर्व पतसंस्थांना कार्यक्षम व्यवस्थापनासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत’’, असे यावेळी नूतन उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले.

    प्रारंभी सद्गुरु व महाराजा उद्योग समुहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप यांनी नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत करुन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर सर्वानुमते दिलीपसिंह भोसले यांची अध्यक्ष म्हणून तर जयकुमार शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करणेत आली. यावेळी फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालक रविंद्र बेडकिहाळ, प्रितम गांधी, गणपतराव निकम, शैलेंद्र शहा, धैर्यशील अनपट, अंकुश साळुंखे, गणपत बेंद्रे, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, राजाकाका फणसे, सद्गुरु व महाराजा उद्योग समुहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप व मान्यवर उपस्थित होते.

No comments