अधिसंख्य पदनिर्मीतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाताच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे - गोरक्ष लोखंडे
सातारा दि.29 : लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जातीमधील सफाई कामगारांच्या 14 पदांचा अधिसंख्य पदनिर्मीतीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळताच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केले.
वाई नगरपरिषद अंतर्गत दलीतवस्ती अंतर्गत चालू वर्षांमध्ये मंजूर कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना करुन श्री. लोखंडे म्हणाले, जागेची पहाणी करुनच बांधकाम विभागाने दलित वस्तीमधील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी केलेल्या 5 वर्षाचा आढावाही त्यांनी घेऊन खर्चाबाबत समाधन व्यक्त केले.
यावेळी त्यांनी नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून पुरविण्यात येणाऱ्या सुविधेचीही माहिती घेऊन रमाई आवास योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.
No comments