तावडीचे जाधव बंधू सातारा जिल्ह्यातून हद्दपार
सातारा - (प्रतिनिधी ) - फलटण तालुका व परिसरातील चैन स्नॅचिंग, जबरी चोरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील २ भावांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरता तडीपार केले आहे. सराईत टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव (वय २४) तसेच निखील उर्फ काळु सुरेश जाधव (वय २५ वर्षे दो. रा. तावडी ता. फलटण) असे त्यांची नावे आहेत.
फलटण तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका या हद्दीमध्ये सातत्याने मालमत्तेचे गुन्हे करण्यात हे दोघे भाऊ आघाडीवर होते. यांच्यावर जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुध्द दोन वर्षे तडीपारीची प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे पाठवला.
सदर प्रस्तावाची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभागचे राहुल धस यांनी केली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी होवुन त्यांना सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
No comments