मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून ४ लाख रुपयांचा ऐवज लुटला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० जुलै २०२५ - वनदेवशेरी, कोळकी तालुका फलटण येथे शिंगणापूर रस्त्यावर सकाळी चालायला गेलेल्या दोन महिलांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून, त्यांच्याकडील ४ लाख रुपये किंमतीचे २ सोन्याची मिनी गंठण लुटून नेल्याप्रकरणी तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 19/07/2025 रोजी सकाळी 06.15 वाजता चे सुमारास सुरेखा अजय चोरगे व गायत्री सौरभ वेदपाठक दोघी रा.मालोजीनगर कोळकी ता. फलटण या नेहमी प्रमाणे शिंगणापुर रोडने पायी चालण्याकरीता गेले असता, गोविंदपार्क समोर रोडवर वनदेवशेरी,कोळकी ता. फलटण जि. सातारा येथे मास्क घातलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी चाकु व कोयत्याचा धाक दाखवुन जबरदस्तीने २,१२,६०० रुपये किंमतीचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी शॉर्ट गंठण व त्यामधील ४.७२० ग्रॅम वजनाचे डोरले तसेच १,८९,९७३ रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी शॉर्ट गंठण व त्यामधील डोरले २० ग्रँम वजनाचे असा एकूण ४,०२,५७३ रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम हे करीत आहेत.
No comments