प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत
सातारा दि २० (प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर साताऱ्यात प्रथमच आगमन झाले सारोळा ते सातारा व तेथून कराड यादरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शशिकांत शिंदे तू मागे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा या घोषवाक्याची जणू आठवण करून दिली.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले शिरवळ पासून कराड पर्यंत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले सातारा राष्ट्रवादी भवनात त्यांची महिला आघाडीने स्वागत केली. पोवई नाका येथे त्यांनी छत्रपती शिवराय व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पक्षात पडलेल्या फुटी नंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण होते मात्र शनिवारी साताऱ्यात वेगळाच माहोल पाहायला मिळाला जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली नाक्यावर क्रेनला लटकणारे मोठ मोठाले हार आणि आमचा नेता शशिकांत शिंदे अशा घोषणाबाजी करण्यात आल्या.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी 2019 मध्ये पक्षाला सत्तारूढ करणार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय घेण्याच्या अधिकार जिल्हाध्यक्ष नाही मिळतील या पद्धतीने राजकीय समीकरणाची मांडणी होईल तसेच महाविकास आघाडी बाबत मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उभा ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले राज्यभर पक्ष संघटना बांधणीला प्राधान्य दिले जाईल आमदार रोहित पवार यांच्या समवेत 23 24 25 जुलै रोजी फ्रंट सेलच्या बैठका मुंबईत होतील आणि जिल्हा निहाय दौरा करून लोकांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊ असे ते म्हणाले.
No comments