९५ वर्षीय वृद्ध महिला डेक्कन चौक फलटण येथून बेपत्ता
फलटण (गंधवार्ता) – फलटण शहरातील डेक्कन चौक येथून ९५ वर्षीय वृद्ध महिला सुमेदा रमाकांत उपळेकर या दिनांक २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीएक न सांगता बाहेर निघून गेल्याची घटना घडली आहे. त्या अद्याप घरी परत आल्या नसून, २६ जुलै २०२५ रोजी त्यांच्या हरविल्याची फलटण शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार करण्यात आली आहे.
हरवलेल्या सुमेदा उपळेकर यांचे वय ९५ वर्षे असून त्या सडपातळ बांध्याच्या, गोऱ्या रंगाच्या आहेत. त्यांची उंची सुमारे ५ फूट असून, केस पांढरे आहेत. त्या मराठी भाषेत बोलतात.
या प्रकरणी तक्रारदार श्रीमती अमृता विवेक पेटकर ( रा. उपळेकर मंदिराजवळ, डेक्कन चौक, फलटण) यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पुनम वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोणाला सदर वृद्ध महिला दिसल्यास त्यांनी कृपया फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No comments