Breaking News

सोनवडी खुर्द येथील युवकाची हाताची नस कापून आत्महत्या

A youth from Sonwadi Khurd committed suicide by cutting a vein in his hand.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ जून २०२५ - सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथील 27 वर्षीय युवक रविराज लक्ष्मण पोळ याने दिनांक 02 जून 2025 रोजी सकाळी तुकाई मंदिरासमोर  डाव्या हाताची नस कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान सदर इसमाने विषारी औषधसुद्धा पिले होते, सदर मयत हा व्यसनी होता, फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता, तिथे त्याला ब्रेक दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

    सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास रविराजने मंदिरासमोर बसून हाताची नस कापल्याचे लक्षात येताच, संबंधितांनी तातडीने त्याला उपचारासाठी स्पंदन केअर हॉस्पिटल, फलटण येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी 7.30 च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असल्याची फिर्याद रावीराजचे मामा नवनाथ विठ्ठल पवार, वय 38 वर्षे, व्यवसाय-मजुरी, व्यवसाय-शेती, रा. सोनवडी खुर्द, ता. फलटण यांनी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक यादव हे करीत आहेत.

    मयत रविराज लक्ष्मण पोळ याचे वय 27 वर्षे असून तो सोनवडी खुर्द येथील रहिवासी होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

No comments