Breaking News

फलटण तालुक्यातील युवकांचे आशास्थान : युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम

Hope of the youth of Phaltan taluka: Youth leader Sahyadri Bhaiya Kadam......

    फलटण तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष अविरतपणे कार्यरत असलेले जय भवानी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम यांचा आज बुधवार दिनांक 4 जून रोजी वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.......

             फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय चिमणराव उर्फ सूर्याजीराव कदम यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आजही युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम काम करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे काम सह्याद्रीभैय्या कदम हे सतत करत आहेत.

    यामधूनच फलटण तालुक्यातील गावागावात त्यांनी आज आपली स्वतंत्र्य ओळख निर्माण केलेली आहे. अबाल वृद्धांपासून तरुण युवकांमध्येही सह्याद्रीभैय्यांची क्रेझ निर्माण झालेली आहे. सर्वच समाज घटकांमध्ये सहज सहभागी होणारे सह्याद्रीभैय्या कदम आपुलकीने अनेकांशी संवाद साधत असतात, यामुळे गावोगावी सह्याद्रीभैय्या कदम यांचे अनेक मित्रत्वाचे संबंध तयार झालेले आहेत. 

    सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे स्वर्गीय माजी आमदार चिमणरावजी कदम यांनी आदर्श घालून दिलेले आणि अखंडपणे निस्वार्थी भावनेतून काम करत असलेले सह्याद्रीभैय्या कदम यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक वाटचाल आगामी काळातही अखंडपणे अशीच होत राहो, हीच आई  तुळजाभवानी चरणी प्रार्थना. 

  फलटण तालुक्यात मागील आठवडाभरात अवकाळी मुसळधार पाऊस झाला. यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले सध्या याबाबतचे पंचनामे सुरू आहेत. याबरोबरच मागील महिनाभरापूर्वी  अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे निष्पाप  नागरिकांवरती हल्ला चढवला, यामध्ये अनेक निष्पाप  नागरिक शहीद झाले, या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्याचे युवा नेते, जय भवानी एज्युकेशन सोसायटी  अध्यक्ष सह्याद्रीभैय्या कदम यांचा 4 जून रोजी होणारा वाढदिवस अतिशय साधेपणाने संपन्न होत आहे. 

पै. सुरज हिंदुराव कदम पाटील 
संस्थापक अध्यक्ष
सह्याद्रीभैया युवा मंच (फलटण)

No comments