फलटण तालुक्यात ३५०० घरकुलांना मंजुरी ; आ.सचिन पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील घरकुलांचे वाटप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ जून २०२५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवराजसिंह चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नांतून फलटण तालुक्यासाठी एकूण ३५०० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ६०० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरांच्या चाव्या आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांनी पक्क्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
ही योजना सरकारच्या ‘सर्वांसाठी घर’ या अभियानाचा एक भाग असून, लाभार्थ्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळे फलटणमधील अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना निवारा मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे.
या उपक्रमामुळे फलटण तालुका आत्मनिर्भरतेच्या दिशेने अधिक बळकट पावले टाकत असून, सामाजिक न्याय व समान संधीचा आदर्श उभारला जात आहे. आगामी टप्प्यात उर्वरित मंजूर घरकुलांचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments