युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम यांचा वाढदिवस साधेपणाने होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जून २०२५ - जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम यांचा ४ जून रोजी होणारा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार आहे. ऑपरेशन सिंदूर तसेच अवकाळी पाऊस यामुळे अतिशय साधेपणाने युवा नेतृत्व सह्याद्रीभैय्या कदम यांचा वाढदिवस संपन्न होणार असल्याचे सह्याद्रीभैय्या कदम युवा मंच फलटण तालुका संस्थापक अध्यक्ष पैलवान सुरज कदम यांनी सांगितले.
दरम्यान आजवर प्रत्येकवर्षी माझा वाढदिवस सामाजिक उपक्रम आणि विविध गोष्टींच्या माध्यमातून साजरा करत असतात. या वर्षी मोठ्याप्रमाणात अवकाळी पाऊसाने शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने तसेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात व त्यानंतर झालेल्या कारवाईत देशातील अनेक निरपराध नागरिक आणि शूर जवानांना प्राण गमवावे लागले. ह्या अतिशय दुःखद व मन व्यथित करणाऱ्या घटना असल्यामुळे 4 जून रोजी वाढदिवस साजरा करणार नाही, मला भेटायला न येता सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन सह्याद्रीभैय्या कदम यांनी केले आहे.
No comments